या ‘मास हिप्नॉटाईज्ड’ अवस्थेत माझी असंख्य मित्रमंडळी, दूरचे व जवळचे नातेवाईक आणि अगदी (गुजराती) शाळेतील सवंगडी नेहमीच आढळून येतात…
त्यातील अनेक जण हे पूर्वापार काँग्रेस विरोधक होतेच, परंतु आता त्यांच्या विरोधाला अधिक धार आल्याचे दिसते आणि काही नातेवाईक हे मूळ काँग्रेस परंपरेशी नातं असणारे, सांगणारे असूनही आज मोदींच्या प्रचारयात्रेत लीलया सामील झालेले दिसत आहेत, तेव्हा मात्र त्यांची कीव करावी की, त्यांच्या संधीसाधूपणाबद्दल थक्क व्हावे, हे समजेनासे होते.......